आजचा युवक आणि तारुण्यभान
आजचा तरुण आणि त्याचे तारुण्यभान याविषयी आज खूप चर्चा होताना दिसते. तसे पाहिले तर प्रत्येक पिढीमध्ये तरुण आणि त्यांच्या वागण्या-बोलण्याची चर्चा होताच असते. तरीही आज मात्र आम्हा तरुणांच्या या नव्या पिढीविषयी खूपच चर्चा होताना दिसते. याचे कारण आजचे बहुतांशी तरुण दिशाहीन आणि व्यसनाधीन आहेत. आजचे तरुण दिशाहीन आहेत येथपासून ते पाश्चात्यांच्या अंधानुकरणांमुळ वेगवेगळ्या वाईट व्यसनांमध्ये अडकले आहेत इथपर्यंत त्यांच्यावर आरोप आहेत. या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे हे आजच्या तरुणाईन अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. हा आरोप आजच्या सरसकट तरुणाईवर अन्याय करणारा असला तरी त्यातील काही भाग खराही आहे. आजच्या आम्हा तरुणांना मिळणारे स्वातंत्र्य, मिळणारा रोजचा पॉकेटमनी, बदललेल्या वातावरणारा होणारा मनावरील प्रभाव, प्रत्येक क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धा, पालकांच्या व समाजाच्या वाढलेल्या अपेक्षा, आजूबाजूचे भ्रष्टाचारी, मूल्यहीन समाजजीवन, प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव, सुशिक्षित बेकारीमुळे होणारा तरुणांचा कोंडमारा या सर्वांचा परिणाम तरुणांच्यावर होण स्वाभाविकच आहे. पण यातूनही आम्ही तरुणांनी जीवनाचा