महान भौतिकशास्त्रज्ञ : रिचर्ड फाईनमन

  आजकाल नॅनो हा शब्द आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. हे तंत्रज्ञान मानवाचे जीवन अधिक सुखी व गतिमान करत आहे. या तंत्रज्ञानाची चाहूल सर्वप्रथम नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन यांनी १९५९ सालीच करून दिली होती. त्यांचे पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन, अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्व आणि पार्टन मॉडेल इ. असे महत्वपूर्ण योगदान त्यांनी जगाला दिले. १९९१ साली ‘द फिजिक्स वर्ल्ड’ या मासिकने जगातल्या आघाडीच्या दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला होता. अशा या संशोधक, चित्रकार, संगीतकार, शिक्षक यांची आज ११ मे रोजी १०० वी जयंती आहे. त्यानिमित्त –


सन १९१८ साली मेलविल फाईनमन आणि ल्युसिल फिलिप्स या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या रिचर्ड फाईनमन या मूलाने पूढील आयूष्यात संम्पूर्ण जग गाजवले. लहानपणी त्यांना ‘रिटी’ या टोपण नावाने संबोधले जायचे. आपल्या मूलाने विज्ञानात संशोधन केले पाहिजे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यास गणितीय संकल्पना शिकवणे, संग्रहालयात घेऊन जाणे, इ. गोष्टी आई-वडिल जाणीवपूर्वक करत असत परिणामी रिटीची कल्पनाशक्ती बहरत गेली. रिटीला कोणतीही गोष्ट प्रयोग करून बघण्याची तसेच प्रत्येक गोष्टीचा गाभा समजून घेण्याच्या सवयी त्याच्या बालपणातच लागल्या.
कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी तरुणपणी फाईनमन यांनी आपल्या मावशीच्या रेस्टॉरंट मध्ये काम केले. हे चालू असतानाच फाईनमन यांनी विज्ञान व गणित विषयात चांगले मार्क मिळविले. तरी देखील ते केवळ ज्यू धर्मीय असल्याने अनेक विद्यापीठात त्यांना प्रवेश नाकारला गेला. शेवटी ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) या जगविख्यात विद्यापीठात प्रवेश मिळाला. तेथे असतानाच फाईनमन यांच्या लक्षात आले की, गणितातले संशोधन हे बुद्धिला आनंद देणारे आहे परंतु त्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग करून पाहण्यात जास्त मजा आहे. त्यामुळे त्यांनी गणिताऐवजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा विषय निवडला आणि नंतर ते भौतिकशास्त्राकडे वळले. त्यांच्या अभ्यासुवृत्तीमुळे एमआयटीत समीकरणे सोडवण्यात त्यांचा हातखंडा तयार झाला. परिणामी, त्यांचे हे समीकरणे सोडवण्यातील वर्चस्व सर्वमान्य झाले होते. येथेच फाईनमन यांचा ‘अणूतल्या विविध बलांच मापन करणारी समीकरणे’ हा प्रबंध ‘फिजिकल रिव्हू’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला.
१९४३ च्या सुमारास, फाईनमन यांना ओपेनहायमर यांनी मॅनहॅटन या अणुबॉम्ब निर्मितीच्या गुप्त प्रोजेक्टसाठी बोलावून घेतले. १६ जुलै, १९४५ रोजी पहाटे न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात या अणुबॉम्बच्या चाचणी साठी फाईनमनसह प्रोजेक्टमधील सर्व शास्त्रज्ञ जमले होते. धाडसी फाईनमन यांनी उघड्या डोळ्यांनी या स्फोटाचे अचाट असे दृश्य पाहीले. मॅनहॅटन या प्रोजेक्टनंतर फाईनमन यांनी मनावरील ताण व थकवा दूर करण्यासाठी दूर असलेल्या कॉर्नेल व त्यानंतर काही कालावधीनंतर कॅल्टेक विद्यापीठात काम करायला सुरवात केली.
फाईनमन भौतिकशास्त्र अतिशय सुंदर व सोप्या भाषेत शिकवायचे, त्यामुळेच ते विध्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. शिकवण्याबरोबरच त्यांची व्याख्यानेही खूप लोकप्रिय होती. ती प्रचंड गाजली. या व्याख्यान संग्रहाचे ‘फाईनमन लेक्चर सीरीज’ या नावाने काढलेले तीनही खंड लोकप्रिय झाले. फाईनमन जसे चांगले वक्ते होते तसे ते उत्तम लेखकही होते. त्यांचे ‘शुअरली यू आर जोकिंग मिस्टर फाईनमन’ हे पुस्तक सामान्य माणसांपासून ते संशोधकांपर्यंत लोकप्रिय झाले. फाईनमन यांनी भौतिकशास्त्रातील आण्विक कणासंबंधातील गणितीय समीकरणाच्या काढलेल्या आकृत्या ‘फाईनमन आकृत्या’ या नावाने जगप्रसिद्ध आहेत.
सन १९६५ साली फाईनमन, श्रॅौडिंजर आणि शिन-इतिरो-तोमोनागा यांना ‘क्वाँटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स’ मधील योगदानाबद्दल ‘नोबेल पारितोषिक’ बहाल करण्यात आले. उतरत्या वयात फाईनमन यांना कॅन्सर झाला. शेवटच्या काही वर्षात तर कॅन्सर आणखीनच बळावला. अखेर १५ फेब्रुवारी, १९८८ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी या लाडक्या शास्त्रज्ञाने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांच्यावर असंख्य पुस्तके, नाटके, चित्रपट निघाले. त्यांची लेक्चर्स आजही युट्युबवर पाहिली जातात.
शास्त्रज्ञ फाईनमन यांचे विज्ञानावरील प्रेम, सतत प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची धडपड, संशोधनात झोकून देणे, मानवतावादी दृष्टी, माहिती पेक्षा ज्ञानाला असणारे प्राधान्य, तत्वज्ञानाची आवड, सतत आनंदी राहण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती. फाईनमन सांगत, “तुमच्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करा, विश्वाच्या रहस्याचा शोध घ्या, प्रत्येक गोष्टीच्या खोलवर गेलात तर ती गोष्ट अधिक विलक्षण आणि मजेदार वाटेल, तुम्हाला कोण व्हायचय यापेक्षा तुम्हाला काय करायचय याकडे लक्ष दया.”
अशा या थोर शास्त्रज्ञास त्यांच्या जयंती निमित्य माझे कोटी कोटी प्रणाम.
- सत्यजित संजय पाटील
एम.एस्सी. भाग १,
भौतिकशास्त्र विभाग,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
मो. ९४०३६७२६७१

Comments

Popular posts from this blog

आमची अविस्मरणीय सहल

माझा गाव

आजचा युवक आणि तारुण्यभान