दुष्काळ

आपल्या देशात पडला आहे सर्वत्र दुष्काळ
पण हा तर नेत्यांच्या निवडणूक निधीचा सुकाळ II
ट्रक भरून चारा, धान्य, कपडे पाठविण्यात पुढे
परंतु दुष्काळग्रस्तांना मिळते की नाही हेच एक कोडे ? II
मदतीपेक्षा नेते प्रसिद्धीत पुढे
जनता मात्र हे सर्व पाहती बापू डे II
जलसिंचनावरती खर्च कोटींच्या पुढे
दुष्काळ मात्र येथे वारंवार पडे II
दुष्काळग्रस्त जनता धायमोकलून रडे
सर्व पक्षीयांचे मात्र मदतीचे वाजती चौघडे II
आपण मात्र उचलुया मदतीसाठी खारीचा वाटा
पण कुठेही करू नका त्याचा बोभाटा II

Comments

Popular posts from this blog

आजचा युवक आणि तारुण्यभान

महान भौतिकशास्त्रज्ञ : रिचर्ड फाईनमन

आमची अविस्मरणीय सहल