माझा गाव
सुंदर आहे माझा गाव
त्याचे आहे दिल्ली दरबारी नाव II
बुद्धीवंतांचे आणि पैलवानांचे गाव
भक्ती आणि युक्तीमुळे शांतताप्रिय आहे माझा गाव II
छोट्याश्या गावात आहे सुंदरशी शाळा
सर्वांनाच लावते ती शिक्षणाचा लळा II
गावाच्या मध्यभागी आहे शोभिवंत तळे
गावच्या शिवारात डोलती ऊसाचे मळे II
तंटामुक्तीत आहे माझा गाव सर्वांच्या पुढे
स्त्री-पुरुष समानतेचे वाजते येथे चौघडे II
कन्या वाचवू, देश वाचवू, वृक्ष संवर्धनात देखील पुढे
असा माझा गाव सर्वांना लळा लावितो गडे II
क्षणोक्षणी येते मला गावाची आठवण
त्यामुळे येतो माझा कंठ दाटून II
Comments
Post a Comment