Posts

आमची अविस्मरणीय सहल

  आम्ही बी.एस्सी. पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना आमची सहल आमच्या भौतीकशास्त्र विभागामार्फत म्हैसूर बेंगलोर या ठिकाणी घेऊन जायचं ठरलं. अर्थात सहल ही शैक्षणिक व मनोरंजन अशा दोन्ही साच्यात बसणारी होती. दोन महिने आधी सर्वांची रेल्वेची तिकिटे काढण्यात आली होती. सर्वांची तिकिटे एकत्र काढण्यात काही प्रमाणात यश आले होते. पाचवी सेमिस्टर होऊन काहीच दिवस झाले होते. सर्वांना आता सहलीचे वेध लागले होते. दि. २७ डिसेम्बर २०१६ रोजी आम्ही कोल्हापूरहून हरिप्रिया रेल्वेने मिरजपर्यंत व तेथून सुवर्ण जयंती एक्सप्रेसने म्हैसूरकडे कूच केली. माझा तर रेल्वेमधून हा प्रथमच प्रवास होता त्यामुळे मी खूपच उत्सुक होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हैसूरमधून आम्ही लगेच २८ सीटर गाडीने कुर्गकडे प्रस्थान केले. वास्तवत: कुर्ग हे थंड हवेचे ठिकाण असून भारतातील स्कॉटलँड म्हणून देखील ते प्रसिद्ध आहे. तेथील ऐतिहासिक तिबेटीयन बुद्धलोकांचे सुवर्ण मंदिर लक्षवेधी आहे. दुपारच्या वेळी आम्ही तेथे उपलब्ध असलेला रिव्हर राफ्टींग हा साहसी खेळ खेळण्यासाठी कावेरी नदीतील पाण्यात उतरलो, अर्थात सर्व काही सुरक्षीतते...

दुष्काळ

आपल्या देशात पडला आहे सर्वत्र दुष्काळ पण हा तर नेत्यांच्या निवडणूक निधीचा सुकाळ II ट्रक भरून चारा, धान्य, कपडे पाठविण्यात पुढे परंतु दुष्काळग्रस्तांना मिळते की नाही हेच एक कोडे ? II मदतीपेक्षा नेते प्रसिद्धीत पुढे जनता मात्र हे सर्व पाहती बापू डे II जलसिंचनावरती खर्च कोटींच्या पुढे दुष्काळ मात्र येथे वारंवार पडे II दुष्काळग्रस्त जनता धायमोकलून रडे सर्व पक्षीयांचे मात्र मदतीचे वाजती चौघडे II आपण मात्र उचलुया मदतीसाठी खारीचा वाटा पण कुठेही करू नका त्याचा बोभाटा II

माझा गाव

सुंदर आहे माझा गाव त्याचे आहे दिल्ली दरबारी नाव II बुद्धीवंतांचे आणि पैलवानांचे गाव भक्ती आणि युक्तीमुळे शांतताप्रिय आहे माझा गाव II छोट्याश्या गावात आहे सुंदरशी शाळा सर्वांनाच लावते ती शिक्षणाचा लळा II गावाच्या मध्यभागी आहे शोभिवंत तळे गावच्या शिवारात डोलती ऊसाचे मळे II तंटामुक्तीत आहे माझा गाव सर्वांच्या पुढे स्त्री-पुरुष समानतेचे वाजते येथे चौघडे II कन्या वाचवू, देश वाचवू, वृक्ष संवर्धनात देखील पुढे असा माझा गाव सर्वांना लळा लावितो गडे II क्षणोक्षणी येते मला गावाची आठवण त्यामुळे येतो माझा कंठ दाटून II