माझा गाव
सुंदर आहे माझा गाव
त्याचे आहे दिल्ली दरबारी नाव II
बुद्धीवंतांचे आणि पैलवानांचे गाव
भक्ती आणि युक्तीमुळे शांतताप्रिय आहे माझा गाव II
छोट्याश्या गावात आहे सुंदरशी शाळा
सर्वांनाच लावते ती शिक्षणाचा लळा II
गावाच्या मध्यभागी आहे शोभिवंत तळे
गावच्या शिवारात डोलती ऊसाचे मळे II
तंटामुक्तीत आहे माझा गाव सर्वांच्या पुढे
स्त्री-पुरुष समानतेचे वाजते येथे चौघडे II
कन्या वाचवू, देश वाचवू, वृक्ष संवर्धनात देखील पुढे
असा माझा गाव सर्वांना लळा लावितो गडे II
क्षणोक्षणी येते मला गावाची आठवण
त्यामुळे येतो माझा कंठ दाटून II
मी शि. दुं. पदमनवर कार्यवाह मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज.
ReplyDeleteनेहमीच्या बालविज्ञान संमेलनाध्यक्षापदी आपले नाव माझे मित्र डॉ मानसिंग यांनी सुचवले आणि नेसरी च्या संमेलनाचा आढावा घेतल्यावर आनंद झाला. आपले मनोगत सर्वाना फारच आवडले आणि त्यामुळे आपला जीवन वृत्तांत कडे वळलो आणि आपल्याविषयी अनेक गोष्टी समजल्या आपल्या भाषणाची क्लिप हि समन्वयक उदय कडुन घेऊन पाहिली.
मी काही तंत्रस्नेही नाही होण्याचा प्रयत्न मात्र करतोय. यथायोग्य आपणाशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न करेन.