महान भौतिकशास्त्रज्ञ : रिचर्ड फाईनमन
आजकाल नॅनो हा शब्द आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. हे तंत्रज्ञान मानवाचे जीवन अधिक सुखी व गतिमान करत आहे. या तंत्रज्ञानाची चाहूल सर्वप्रथम नोबेल पुरस्कार प्राप्त अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन यांनी १९५९ सालीच करून दिली होती. त्यांचे पाथ इंटिग्रल फोर्म्युलेशन, अतिशीत हेलिअमच्या सुपरफ्लुईडिटी तत्त्व आणि पार्टन मॉडेल इ. असे महत्वपूर्ण योगदान त्यांनी जगाला दिले. १९९१ साली ‘द फिजिक्स वर्ल्ड’ या मासिकने जगातल्या आघाडीच्या दहा सर्वोत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञात त्यांचा समावेश केला होता. अशा या संशोधक, चित्रकार, संगीतकार, शिक्षक यांची आज ११ मे रोजी १०० वी जयंती आहे. त्यानिमित्त – सन १९१८ साली मेलविल फाईनमन आणि ल्युसिल फिलिप्स या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या रिचर्ड फाईनमन या मूलाने पूढील आयूष्यात संम्पूर्ण जग गाजवले. लहानपणी त्यांना ‘रिटी’ या टोपण नावाने संबोधले जायचे. आपल्या मूलाने विज्ञानात संशोधन केले पाहिजे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यास गणितीय संकल्पना शिकवणे, संग्रहालयात घेऊन जाणे, इ. गोष्टी आई-वडिल जाणीवपूर्वक करत असत परिणामी