Posts

Showing posts from 2016

आमची अविस्मरणीय सहल

  आम्ही बी.एस्सी. पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना आमची सहल आमच्या भौतीकशास्त्र विभागामार्फत म्हैसूर बेंगलोर या ठिकाणी घेऊन जायचं ठरलं. अर्थात सहल ही शैक्षणिक व मनोरंजन अशा दोन्ही साच्यात बसणारी होती. दोन महिने आधी सर्वांची रेल्वेची तिकिटे काढण्यात आली होती. सर्वांची तिकिटे एकत्र काढण्यात काही प्रमाणात यश आले होते. पाचवी सेमिस्टर होऊन काहीच दिवस झाले होते. सर्वांना आता सहलीचे वेध लागले होते. दि. २७ डिसेम्बर २०१६ रोजी आम्ही कोल्हापूरहून हरिप्रिया रेल्वेने मिरजपर्यंत व तेथून सुवर्ण जयंती एक्सप्रेसने म्हैसूरकडे कूच केली. माझा तर रेल्वेमधून हा प्रथमच प्रवास होता त्यामुळे मी खूपच उत्सुक होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हैसूरमधून आम्ही लगेच २८ सीटर गाडीने कुर्गकडे प्रस्थान केले. वास्तवत: कुर्ग हे थंड हवेचे ठिकाण असून भारतातील स्कॉटलँड म्हणून देखील ते प्रसिद्ध आहे. तेथील ऐतिहासिक तिबेटीयन बुद्धलोकांचे सुवर्ण मंदिर लक्षवेधी आहे. दुपारच्या वेळी आम्ही तेथे उपलब्ध असलेला रिव्हर राफ्टींग हा साहसी खेळ खेळण्यासाठी कावेरी नदीतील पाण्यात उतरलो, अर्थात सर्व काही सुरक्षीततेची क